उध्वस्त





उध्वस्त | मराठी कविता | शशिकांत दूधगांवकर





उध्वस्त

उध्वस्त
कधी ही कोठे ही कोणाला ही
हवा पाणी आग जमिन
कोणीही करू शकते
का
हा प्रश्न पडला तरी
विचारून उपयोग नसतो
स्वतःला ही
कोणाला गाठेल मृत्यू
कोण जिंवतपणी मृत होईल
स्मृतीत कोण उरेल
कोण मृतवत जगेल
कोणास ठाऊक येथे
कधी कोसळते आकाशातून विमान
कागदी असल्यासारखे
कधी लागतात आगी
ठिणगी नसतानाही
कधी रस्ते अकस्मात संपवतात
प्रवास अनेकांचे
दहा वीस पंचवीस
आणि शंभर दोनशे सुद्धा होतात
एका क्षणी
उध्वस्त
कधी फिरतात बुलडोझर
जिवंत आयुष्यावर
कधी हळूवार अदाकारीने करतो उध्वस्त
जामिन
कधीच न मिळणारा
कधी कळत नकळत निमुळत्या होता होता
बंद होऊ लागतात वाटा
चिरडून टाकत उमेद
जगण्याची
शेवटी उरते काय
जिवंत असलेले अथवा मृत पावलेले
पार्थिव
आणि एक अनंत पोकळी
हुंदके आणि अश्रूंनी भरून
ओसंडून वाहणारी


Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading