
परिघ
आकाश ढग पाऊस सुर्योदय आणि सुर्यास्त
यावर लिहीता वाचता
कधी कधी वाटते
आपण बंदिस्त होत चाललोय का
दिवसेंदिवस
आक्रसत चाललेल्या क्षितीजाच्या आत
कधीही न पाहिलेल्या
पाहून न पाहिल्यासारखे केलेल्या
अपरिचित वास्तवांच्या परिघानां
भेदने तर सोडा
स्पर्श करण्याचा प्रयत्न तरी केला आहे का
मग दिसू लागतात अचानक
दुर्लक्ष केलेल्या वास्तवांचे
असंख्य गोलाकार परिघ
दुरवर तंरगताना
आणि आपल्या बुडबुड्याचा
एकाकीपणा अधोरेखित करणारी
अथांग पोकळी
त्यावेळी मात्र भेसूर भासू लागते
©️ShashikantDudhgaonkar
