A poem in Marathi language. My mother tongue.

रात्र भाळलेली
चंद्राहून शितल चेहऱ्यावर
पसरलेले चांदणे
गालावरच्या खळीमधून
उसळ्या मारणारे अवखळ हसे
आणि ती अलगद वळते
एक नाजूकसा झोका घेत
मोकळे केस आणि साडीचा पदर
तोल राखता राखता गडबडतात
अन सावरून जातात तीच्या मागे
हवेत तरंगत
एक गिरकी घेत
आणि तिच्या पाठमोऱ्या रूपावर
भाळलेली रात्र
गहिरी होता होता
थबकते तेथेच
क्षणभर
©️ShashikantDudhgaonkar
