Scroll down for English translation
उतारा (भुताखेतांना टाकलेला)
तसा तो गेले पाच दहा वर्ष ह्या परिसरात नेहमीच दिसायचा
कधी दुकानांच्या पायरीवर बसून शुन्यात हरवलेला
कधी पुलाखालच्या धुळीत निवांत पहूडलेला
कधी चित्रविचीत्र हावभाव करत
इकडून तिकडे उगाच चौकात फिरणारा
वाढलेले केस हाताची वाढलेली नखे
वाढलेल्या दाढीच्या सुध्दा जटा झालेल्या
फाटक्या कपड्यातून दिसणाऱ्या
त्याच्या मळक्या त्वचेला
पाण्याचा ओलावा कधीच लागला नसावा
कधी शर्ट खांद्यावर टाकून उघडाच फिरायचा
सरकलेल्या विजारीला आणखी खाली ढकलायचा
मग लोक आपल्या नजरा दुसरीकडे वळवायचे
तटस्थपणे
तसेही त्याच्याकडे जाणून बुजूण कोणी पाहत नसे
नजरेच्या टप्प्यात आला आणि दिसला
इतकेच त्याचे महत्व होते
त्याला खाऊ घालणारे होते
कपडे देणारे होते
खेकसून हाकलून लावणारे सुध्दा होते
पण या सर्वांपेक्षा त्याची टिंगल करणारे टगे मात्र
त्याला खुप आपलेसे वाटायचे
कारण ते वेळ द्यायचे
काही काळ का असेना, साथ द्यायचे
असाच एका दिवशी तो बसस्टॅापच्या बाकड्यावर
जसा जगला तसाच मरून गेला
उपेक्षित
आसपासच्या फ्लेक्स मधून
नेतेमंडळी पाहत होती त्याच्याकडे
आपले दोन्ही हात जोडून
कोणी देशाच्या उज्वल भविष्याचे स्वप्न
तर कोणी देशाचा जाज्वल्य इतिहास सांगत होते
कोणी रोटी कपडा और मकान
तर कोणी
सबसे भारी मेरी दुकान सांगत होते
या सगळ्या आण्णा भाऊ दादांच्या गर्दीत
तो मात्र एकटाच होता
जिवंतपणी आणि मेल्यावरही
उंचच्या उंच इमारती, विमानतळ, चकचकीत रस्ते
व इंटरनेट, मोबाईल, ए आय च्या झगमगाटात
असे अनेक “तो” व “ती”
उताऱ्याला टाकलेल्या लिंबासारखे
रस्त्यावरच जगतात व तिथेच मरतात
जीडीपी व दरडोई उत्पन्नाच्या चढत्या आलेखात
कसलाच सहभाग नसलेले
मनुष्य सोडा
प्राणी म्हणून सुध्दा कोणी हिशेबात धरत नसलेले
©️ShashikantDudhgaonkar
A loose translation in English. But not all nuances can conveyed in the translation. Some words, some ideas and some references are unique to each language.
Peripheral
He was quite a permanent fixture
In the neighbourhood
Since maybe five or ten years
Can’t remember exactly
Sitting on the pavement
On steps of a closed shop
Starting at the world in his own way
As if he could see something
That was invisible to us
Sometimes he walked in the chaos
At the roundabout
Waving frantically at no one
Long tangled hair
Even his beard was matted
Muddy skin visible through tattered clothes
Which was never touched by the warmth
Of a nourishing bath
Sometimes he used waves his shirt over his head
Half naked
At times his ill fitting trouser used to slid down
And people would turn their eyes away
Any ways no one would look at him intentionally
Sometimes he just came in their field of vision
For them to see him briefly
There were people who fed him
Some gave him clothes
Most of all he loved those rogues
Who bullied him
For they gave him their valuable time
And some company
Just as he lived, he died one day
Without any fanfare
Lying still on a bench
On the sidewalk
Seen by all noticed by none
Even falling leaves attract a lot of fans
Poets painters and photographers
Amidst the glitter of skyscrapers, airports, smooth highways
And internet mobiles and AI
There are many of “them”
He her them theirs whatever
Who live and die amidst us
Yet never falling in the perimeter
Of our consciousness
©️ShashikantDudhgaonkar

This reminds me of the “Invisible People” YouTube channel, which I highly recommend…
~David
Will definitely watch “Invisible People”
Added an English translation David.
Wonderful and descriptive poem!
Thanks a lot