वाटा

वाटा

घेऊन जाते ती

कधी उंच शिखरावर

कधी लावते वाट

पोहोचवून मसणावर

वाटा वाटाच असतात

कधी पोहवतात

कधी उगाच वळसे घेत

आरभांवर आणून सोडतात

वाटा चुकवतात

कधी वाटसरू सुध्दा चुकतात

अनेक अभिमन्यू

चक्रव्हूहात फसतात

बाहेर पडण्याची

वाट शोधत

बरेचसे पोहचतात

काही पोहचवले जातात

जेथे जायचे तेथेच का

ते मात्र माहीत नाही

काहींच्या वाटा मात्र

फुटत नाहीत कधीच

आरंभावर अंत होतो

त्यांच्या प्रवासाचा

©️ShashikantDudhgaonkar

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading