माय

परातीत पिठाचे
करून आळे
ओतायची तू पाणी
हळूवार पणे

अलगद फिरवून मग
नाजूक हात
पिठ करायचीस
भर्रकन ओले

लदबदल्या बोटांनी मग
साधून नाद
परातीला येई
तबल्याचा साज

आोंजारून गोंजारुन
कधी मायेने धोपटून
पिठाचा होई
मऊसूत गोळा

कळत नकळत
आठवणीच्या पसार्यात
तुझा कणकेचा गोळा
आज ही ओला

©️ShashikantDudhgaonkar