नाती असतात नदीसारखी

वाहणारी ताजीतवाणी

कधी असतात तळ्या सारखी

थबकलेली थांबलेली

कधी असतात डोह

खोल व निर्वीकार

कधी समुद्रा सारखी अथांग

चहुबाजूला पसरणारी

कधी अवखळ झर्या सारखी

पावसाळ्यात उगवणारी

खट्याळ

खिदळणारी

कधी पावसासारखी

बेभान कोसळणारी

भिजवणारी

थिजवणारी

तर कधी असतात नाले

आसपास वाहणारे

मैला घेऊन येणारे

मैला घेऊन जाणारे

©️ShashikantDudhgaonkar