कवितेचे झाड

कवितेच्या सावलीत कधी

बसावेसे वाटते

पहुडावे वाटते

हिरव्या गवतावर

असंख्य शब्दांच्या

वेचावी अलगद

अलंकाराची फुले

पहावी पाने फुले

भाव भावनांची

आसपास हेलकावे खात

तरंगणारी

कधी गवतावर उतरून

शब्दात गुंफणारी

कवितेच्या

पण कविताच ती

कधीतरीच बहरते

तशी ती वैराण माळावर

सुकलेल्या पिवळ्या गवतात

वठलेल्या झुडूपासारखीच असते

खरे तर वास्तवात

ती तशीच असते

वणव्यात होरपळणारी

हळूहळू करपत जाणारी

कवितेतल्या कविस्वप्नातच

ती असते

कोमल तरल स्वप्नवत

बहूरंगी

©️ShashikantDudhgaonkar