चुकलेली वाट

खडतर हा प्रवास वळणांनी भरलेला मैलोमैल खडकाळ कडक उन्हातला पान सुध्दा नाही सावली साठी नदी नाही ओढा चढ सुध्दा संपत नाही संपत आलाय शिधा मोकळी गाठोडी थेंबा थेंबासाठी आता हमरातूमरी दमले भागले वाटाडे रागावलेत खूप मागच्यांवर खापर फोडत शमवतात भूक भुतकाळाचे दाखले देत वाजवतात सूप उज्वल भविष्याचे डोळसांनी झाकले डोळे शहाणे झालेत वेडे पण तरीही … Read more

वेदना

वेदना टोचते जाळते बधीर करते आकांत करते मोठयाने कधी न बोलतां डोळ्यांतून ओसंडून वाहते शांतपणे अन उरते मागे फक्त रितेपण न भरणारे कशानेही कधी तेही जाणवत नाही जेंव्हा असते साथ वेदनांचीच जन्माभर ©️ShashikantDudhgaonkar

नाती

नाती असतात नदीसारखी वाहणारी ताजीतवाणी कधी असतात तळ्या सारखी थबकलेली थांबलेली कधी असतात डोह खोल व निर्वीकार कधी समुद्रा सारखी अथांग चहुबाजूला पसरणारी कधी अवखळ झर्या सारखी पावसाळ्यात उगवणारी खट्याळ खिदळणारी कधी पावसासारखी बेभान कोसळणारी भिजवणारी थिजवणारी तर कधी असतात नाले आसपास वाहणारे मैला घेऊन येणारे मैला घेऊन जाणारे ©️ShashikantDudhgaonkar

अबोल माया

कधी असतेस पाऊसकधी होतेस तुफानकधी करतेस वीजां सांरखारौद्र कडकडाटकधी नुसतीच ढगाळअंधारलेले आकाशतर कधी असतेस प्रखरटोचणारा प्रकाशकधी असतेस बोचरीथंडगार हवातर कधी पुनवेचाशितल चंद्रमारूप खरे कधीतरीतुझेच दिसू देगालावरती निरागस हसू येऊ देनको फवारे शब्दांचेनको अलंकारक्षण अबोल मायेचे पुरे दोन चार ©️ShashikantDudhgaonkar

अंधाराकडे

मीच अखेर सावरतोमाझ्या स्वत:लाआवरतो विखूरलेल्यामनाची कस्पटेटोचणारे बोचणारेतोडणारे मोडणारेवाटेत आपल्यालाअसंख्य भेटतातकाही आपल्या बरोबरचचालत ही असतातकधी वाटते धरावीवाट वेगळीसोडावी कासअन आस सुखाचीपण प्रवास मात्र जवळ जवळसंपतच आलायहोईल सुरू रात्रकधी ही अंधारीअन ओरबाडणारे थांबतीलकदाचित अंधारात तरी©️ShashikantDudhgaonkar

अंत

चिंचोळ्या वाटेवरचालतो धुक्यातदरी दोन्ही बाजूलाप्रवास अंधारातअंधार्या दुःखालाअंधारीच वाटहुंदक्याना ही भीतीकोसळून पडायचीभीतीला ही वाटे भीतीदुःखाला ही दुःखत्या अंधार्या वाटेचामी शोधतो अंत©️ShashikantDudhgaonkar

रात्र एकटी

मंद धुंद रात्रीजाग अचानक आलीएकटे पणाचीजाणिव देत गेलीजागे नव्हते कोणीऐका बोलावयलास्तब्ध हवा श्वासाचीजाणिव देत गेलीनिशब्द अंधार काळाघुसमटवून जीव गेलाअर्ध्या स्वप्नांची पहीलेल्याजाणिव देत गेलाकौला मधुन कवडसेआज एक ही न आलेरात्र अमावसेचीजाणिव देत गेले©️ShashikantDudhgaonkar

गेले विझून दिप

गेले विझून आताते दिप पेटण्या आधीवणव्यात शोधतो आतामी पेटवून मशालीशर पेटले आतापेटतील व्रुक्ष सारेचिमण्या चोचीत माझ्यामावेल किती पाणी.©️ShashikantDudhgaonkar

दिप

लावत होतो दिवेअंधार काढण्यासाठीगेले विझून माझेदिप पेटण्या आधीवातीतून धुराच्यानागमोड्या रेषांखिजवून गेल्या अलगदहवेत विरता विरताभरल्या तेलात बुडल्यामाझ्या कोरड्या वातीहसून झुळूक हवेचीविझवून आग गेली©️ShashikantDudhgaonkar