इस्त्री
इस्त्री शर्टावर नेहमीप्रमाणे इस्त्री फिरवताना पाहत होतो सुरकुत्या अद्रुश्य होताना उरत होता नितळपणा हवाहवासा वाटणारा अंगाला उबदारपणे अलगद बिलगणारा आणि मग उगाच आठवल्या असंख्य सुरकुत्या आयुष्याला पडलेल्या ©️ShashikantDudhgaonkar
इस्त्री शर्टावर नेहमीप्रमाणे इस्त्री फिरवताना पाहत होतो सुरकुत्या अद्रुश्य होताना उरत होता नितळपणा हवाहवासा वाटणारा अंगाला उबदारपणे अलगद बिलगणारा आणि मग उगाच आठवल्या असंख्य सुरकुत्या आयुष्याला पडलेल्या ©️ShashikantDudhgaonkar
वावटळ दुपारच्या रणरणत्या उन्हात वारा असतो निपचीत कुठेतरी सावलीला पडलेला पाखर सुध्दा उडत नाहीत फांद्या, पान हलत नाहीत आसंमत सारा, स्तब्ध समाधीत अन अचानक उठतात गरागरा फिरू लागतात धुळीचे लोट उडवत अनेक वावटळी कधी छेदतात एकमेकाला कधी दुर पळतात आणि विरून जाता जाता कधी एकदम मोठ्या होतात मनातल्या आणि उन्हातल्या सारख्याच असतात वावटळी ©️ShashikantDudhgaonkar
अव्यक्त डोक्यात पसरलेले ढग आणि दाटलेले धुक्यात दिसत नाही काहीच स्पष्टपणे दाटलेल्या अंधारात हरवलेले शब्द कुठे लपलेत कळत नाही बोलायचे असते सांगायचे असते मनातल्या खदखदीला बाहेर मोकळे सोडायचे असते आतल्या आत तिच्या धगीत जळून जायच्या आत पण शब्द काही उमटत नाहीत कंठही फुटत नाही आणि हताश जिभेला आवळून धरतात ओठ आतल्या आत तरीही डोळे बोलतातच … Read more
आजकाल शहरामधे रात्रीच्या आकाशात तारे फारसे दिसत नाहीत, कारण light pollution. शहरातील उजेडामुळे भरपूर तारे दिसणे अवघड झाले आहे. खालील ओळी ह्या तारे न दिसण्याच्या दुसर्या कारणांचा फक्त एक काव्यात्मक विचार आहे. चांदण्या फारश्या चांदण्या दिसत नाहीत आजकाल रात्रीच्या आकाशात लहानपणीचे आकाश भरलेले असायचे चांदण्यानीं आजी म्हणायची लोक मेल्यावर त्यांच्या चांदण्या होतात मग आजकाल मरत … Read more
चिंचोळ्या वाटेवरचालतो धुक्यातदरी दोन्ही बाजूलाप्रवास अंधारातअंधार्या दुःखालाअंधारीच वाटहुंदक्याना ही भीतीकोसळून पडायचीभीतीला ही वाटे भीतीदुःखाला ही दुःखत्या अंधार्या वाटेचामी शोधतो अंत©️ShashikantDudhgaonkar