ओठ





ओठ | Shashikant Dudhgaonkar | Marathi Poem


ओठ

गालाला गालाचा स्पर्श
हळूवार विलग होणारे
थरथरते अधर
ओठांचा ओठांना स्पर्श
ओझरता
अन आवेगाने मारलेली मिठ्ठी
चार ओठांनी
एकमेकांना
कधी अंदाधुंद
तर कधी हळूवार सुरूवात
स्पर्शाच्या अनेक प्रकारांच्या
अनेक पातळ्यांचा आस्वाद
क्षणाक्षणाला बदलत जाणारा
नकळत जवळ येऊ लागलेल्या पापण्यातून
दिसणारा
एका वेगळ्याच तेजाने भारलेला
नवा भासणारा
तोच नेहमीचा चेहरा
भावनांचा असंख्य आवर्तनांनी
एकाचवेळी वेगात आदळत
उडवलेला कल्लोळ
एकाच वेळी एकाच ठिकाणी
उत्कट, तरल आणि जादुई लाटा
भावनांच्या सागरात उसळतात
कोसळतात
परत उसळतात
जेथे भुत आणि भविष्य गमावून बसते
आपले अथांग अस्तित्व
पुर्णपणे
त्या अंत नसलेल्या वर्तमानात
शब्द संपतात, अर्थ निखळून पडतात
त्या स्वत्व गमावलेल्या क्षणातून
कधीच येऊ नये
जाग


Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading