एक पाऊस असा ही

This is my original prom in Marathi language, the English version of which I have posted earlier at, https://shashisverse.com/2023/06/27/a-different-kind-of-rain/

एक पाऊस असा ही

पावसाचे थेंब गळतात छपरातून

आणि साचत राहतात

वेगवेगळ्या आकाराच्या भांड्यात

घरभर मांडलेल्या

बरेचसे ओघळतात तरीही

असलेल्या नसलेल्या फरशीवर

आणि थकलेल्या भिंतीवर

बाहेर कोसळणारा पाऊस

वाहून तरी जातो

घरात पडणारा मात्र

मुरत राहतो

कधीच न संपणाऱ्या

उणिवांच्या पांघरुणात

©️ShashikantDudhgaonkar

1 thought on “एक पाऊस असा ही”

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading