शहरी सूर्यास्त

शहरी सुर्यास्त तापलेला लांबलेला दिवस थकू लागला होता दगाबाज पानांच्या आठवणींनी व्याकूळलेले बोडके झाड पसरू पाहत होते फांद्या ओसाड आकाशाच्या दिशेने न दिसणाऱ्या ढगांच्या शोधात क्षितीज सापडत नसल्याने दोन इमारतीं मधल्या चिंचोळ्या जागेतून जमिनीला स्पर्शू पाहणारा सूर्य आणि रस्त्याचे औटघटकेचे सोबती त्याच्याच उरावरून वाहने हाकत पोहचण्याच्या यत्नात इमारती, बसस्टॅाप, रस्ता आणि मी स्तब्ध आपापल्या मुक्कामी … Read more

ओढ

ओढ कधी काळी थांबत असे मी वाटेवर रोज तुझ्या येण्याजाण्याच्या कधी तू दिसायची अन मनात अनेक तांबूस सुर्य उगवायचे एकाच वेळी नाही दिसलीस तरी आशेच्या चांदण्या चमकत रहायच्या निरभ्र मनात वाट पाहण्याची सुध्दा एक वेगळीच नशा असते तूला मी कदाचीत आठवत ही नसेन तूझ्या जगण्याच्या परिघा बाहेरचे माझे अस्तित्व कधीच तो परिघ लांघू शकले नाही … Read more

तरंग

तरंग गालावर येऊ पाहणारे हसू येऊ की नाही या गोंधळात थबकले होते डोळ्यात नजर प्रयत्न करत होती ह्रदयातला कल्लोळ लपवायचा चेहऱ्यावर असंख्य भावनांची गर्दी लज्जा हर्ष उल्हास आणि अनामिक भिती नितळ पाण्यावर उमटणाऱ्या असंख्य तरंगासारखी एकमेकात विरून एक लोभसवाणा गोंधळ माजवणारी आणि ती थरारणारी तनू हळूच बाजूने निघून जाता जाता ह्रदयात पेरून जाते कळ हवीहवीशी … Read more

नकोसा एकांत

नकोसा एकांत नकळत येतात एकटे बसलेलो असताना कडू गोड खारट आंबट काही जीभ जाळणाऱ्या तिखट बऱ्याच आल्या तश्या विरूनही जातात काही रेंगाळतात, सोबत करतात काही परत जाण्यास टाळा टाळा करतात रुतून बसतात वास्तवात गच्च आठवणी ©️ShashikantDudhgaonkar

दिवाळी आणि आजोळी

दिवाळी आणि आजोळी मागे राहीलेल्या आयुष्याच्या काही वळणांवर पुन्हा पुन्हा जावे आनंदाचे असंख्य तुषार अंगावर घेत मायेच्या कुशीत विसावावे तसा तो खूप मोठा आंनद होता हे त्याकाळी गावीही नव्हते दिवाळी आणि आजोळी समीकरण अगदीच साधे होते का कोण जाणे तिथल्या हवेतच माया होती आजोबा आज्जीला नातवांची मामाला मावशीला भाचरांची न आटणारी ओढ होती दारातून खाली … Read more

पुटपूट

पुटपूट स्वतःशीच पुटपूटत पाहतो आकाशाकडे नाही काही मागत मी तुमच्या किंवा त्यांच्या देवाकडे स्वतःशीच बोलतोय ऐकतोय आवाज स्वतःचाच आसपासच्या गोंगाटात तेवढेच एक सुखः ©️ShashikantDudhgaonkar

भिजलेले मन

भिजलेले मन भर दिवसा अंधारलेल्या होते पावसाच्या धारा दिसत नव्हत्या वाहणार्या पाण्यात पडणार्या असंख्य गोल तरंगावरून कळत होते रिमझिम पाऊस थांबत थबकत चालूच होता झाडांच्या पानावर जमणारे घरंगळून पडणारे मोठाले थेंब अर्ध्या विजारीत रिसोर्टच्या ओसरीत चहाचा घोट घेताना दिसणारी पान्हाळीवरून लागलेली मोत्यांची धार डबक्यात स्तब्ध उभ्या असलेल्या बेडकांच्या पाठीवर पडून फुटणारे थेंब घराच्या कौलावर तबल्याचा … Read more

गंध मातीचा

गंध मातीचा आठवणीत असून न आठवणारा प्रत्येक वेळा नवाच वाटणारा त्या स्तब्ध थबकलेल्या काही क्षणातच जगणारा पहिल्या सरीच्या हलक्या स्पर्शाने सहज फुलणारा तो गंध मातीचा आणि ढगाळलेल्या आसमंतात वार्याच्या मंद झुळूकेवर स्वार होऊन सुध्दा तिथेच रेंगाळणारा इथून तिथे उगाच हेलकावे खात मनाला सुखावणारा पहिल्या स्पर्शाची आठवण देणारा मैत्राच्या प्रेमाच्या आणि वासनेच्या तो गंध मातीचा ©️ShashikantDudhgaonkar

अनंत जन्म

अनंत जन्म रात्री कधीतरी झोपेत, वळली मान अर्धवट उघडलेल्या डोळ्यानी पाहीले उशीवरून वाहणारे, ओघळ मायेचे हळूवार गोंजारणारे, एकटक पाहणारे ओळखीचे तरी नवे वाटणारे ते डोळे निशीगंधाचा सुवास धूंधावणारा आसपास तरंगणारा, त्याचा भास आभास गालांवर पाकळ्या, सुकुमार चाफ्याच्या ओठांचा गुलाब, अर्धवट उमललेला बोलू का नको, यांत कोठेतरी गुंतलेला मी ही स्तब्ध आठवत नाही, कदाचीत श्वास रोखून … Read more

वावटळ

वावटळ दुपारच्या रणरणत्या उन्हात वारा असतो निपचीत कुठेतरी सावलीला पडलेला पाखर सुध्दा उडत नाहीत फांद्या, पान हलत नाहीत आसंमत सारा, स्तब्ध समाधीत अन अचानक उठतात गरागरा फिरू लागतात धुळीचे लोट उडवत अनेक वावटळी कधी छेदतात एकमेकाला कधी दुर पळतात आणि विरून जाता जाता कधी एकदम मोठ्या होतात मनातल्या आणि उन्हातल्या सारख्याच असतात वावटळी ©️ShashikantDudhgaonkar