भूक आणि भीती

भुक आणि भीती भुकेपेक्षा भीती जेव्हां मोठी होते शब्दांची गरज छोटी होत जाते हक्कासाठी लढणे तर लांबच राहीले जगण्यासाठी वाकणे सुरू होते अनिच्छेने का होईना झालेली सुरूवात सवयीची होते, अंगवळणी पडते कायमचे वाकल्यामुळे दिसते पाया जवळचेच थोडेफार आकाशाकडे क्षितीजाकडे क्षितीजाच्याही पलीकडे पाहणे स्वप्नात ही हळू हळू दुर्लभ होत जाते दुर्लभ होत राहते ©️ShashikantDudhgaonkar

अव्यक्त

अव्यक्त डोक्यात पसरलेले ढग आणि दाटलेले धुक्यात दिसत नाही काहीच स्पष्टपणे दाटलेल्या अंधारात हरवलेले शब्द कुठे लपलेत कळत नाही बोलायचे असते सांगायचे असते मनातल्या खदखदीला बाहेर मोकळे सोडायचे असते आतल्या आत तिच्या धगीत जळून जायच्या आत पण शब्द काही उमटत नाहीत कंठही फुटत नाही आणि हताश जिभेला आवळून धरतात ओठ आतल्या आत तरीही डोळे बोलतातच … Read more

चुकलेले वळण

चुकलेले वळण राहून राहून आठवते ती रात्र मंतरलेली तुझ्या नी माझ्या एकमेकाला चुकवणार्या नजरेची तरी चोरून एकमेकांकडे पाहणे काही सोडत नव्हतो दिवसभर पाठ केलेले बोलायचे मात्र बोलत नव्हतो आणि हवा पाण्याच्या पुढे गाढे सरकवत नव्हते वेटरने बरेच काही ठेवले होते समोर उगाच एखादा तुकडा चघळत होतो मी हाताला सुटलेला घाम पॅंटला पुसत होतो मी तु … Read more

अखेरचा सुर्यास्त

अखेरचा सुर्यास्त सिमा रेषा आता ठळक होत चालल्यात परतू लागलीत गुरे आपापल्याच कळपात न संपणारी रात्र रेंगाळतेय क्षितीजावर परतणार्या पाखरांचे थवे पहात बुडतोय सुर्य डोंगरात दरीत खाडीत समुद्रात नजर फिरवाल तेथे दिसू लागलाय सुर्यास्त मावळती आता चहू दिशाना संपवलाय पश्चिमेचा सुध्दा माज पहाट नसलेली रात्रीने ©️ShashikantDudhgaonkar

युध्द

युध्द युध्दात मरतच असतात तसे सैनिक थोडे फार पण सगळेच नाही काही फक्त थोडे फार जरी मरण स्वस्त असले कुठल्याही युध्दात तुमच्या आमच्या सारखे सुध्दा मरतात क्षेपणअस्त्राच्या हल्ल्यात फार नाही काही फक्त थोडेफार इतके काही वाईट नसते युध्द कधीतरीच होणारे स्वप्ने सुध्दा धुळीस मिळतात अनेक लोकांची पण यातना घेतातच तत्परतेने जागा स्वप्नांची शांततेचे काय कौतुक … Read more

गारठा आजचा आणि कालचा

गारठा आजचा आणि कालचा त्या ऋतूतला गारठा आतापेक्षा सुसह्य होता ऊब होती मनांची अनेक सहवासांची अन ढणाणलेल्या विचारांनी पेटलेल्या शेकोट्यांची मनामनात असतात आजही शेकोट्या पेटलेल्या पण, फक्त पाला पाचोळाच असतो विचारांचा जळणारा त्यात गारठा सुसह्य तर होतच नाही डोळे मात्र पाणावतात पसरलेल्या धुराने ! ©️ShashikantDudhgaonkar

चांदण्या

आजकाल शहरामधे रात्रीच्या आकाशात तारे फारसे दिसत नाहीत, कारण light pollution. शहरातील उजेडामुळे भरपूर तारे दिसणे अवघड झाले आहे. खालील ओळी ह्या तारे न दिसण्याच्या दुसर्या कारणांचा फक्त एक काव्यात्मक विचार आहे. चांदण्या फारश्या चांदण्या दिसत नाहीत आजकाल रात्रीच्या आकाशात लहानपणीचे आकाश भरलेले असायचे चांदण्यानीं आजी म्हणायची लोक मेल्यावर त्यांच्या चांदण्या होतात मग आजकाल मरत … Read more

फाटा

फाटा नेहेमीचाच प्रवास आखीव रेखीव वाट सगळे कसे व्यावस्थित चाललेले असते न थांबतां बोलावत असतात नेहमी डोंगराच्या रांगा कधी अस्वस्थ करतो समुद्र उसळलेला उफाळलेला लावलेल्या भातावरच्या नाजूक हिरव्या लाटा नदी नाले आणि धबधबे इशारे करत असतात पण थांबत नाही आपण क्षणभर सुध्दा पण कधीतरी प्रवासात येतो फाटा एखादा दिड्ःमूढ करणारा अनेक वाटा दाखवणारा पण अर्धवट … Read more

इजाजत

इजाजत मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है ऐकावेसे वाटणारे, गुणगुणावेसे वाटणारे गीत आजकाल जरा जास्तच गुणगुणावेसे वाटते माझे, तुमचे किंवा अजून काहीजणांचे सामान पता नही कहां, लपून पडलेले आहे शायद, वळचणीला पडले असेल कदाचीत, अडगळीत धुळ खात असेल किंवा घर बदलताना बांधून ठेवलेले उघडायचेच राहून गेले असेल ते शोधायची वेळ आली आहे किंवा निघूनच … Read more

आत्ममग्न

आत्ममग्न भाव डोळ्यातले कधी न कळले ना शब्दावाचून वळले काही अबोल त्यांची माया मजला कधी न कळली उमगली नाही असणेही त्यांचे माझ्यासाठीच समजूत माझी मी केली इतकी की मी प्रतीसाद त्याना मायेचा कधी न दिला काही अन गुरफटलो विश्वात स्वत:च्या आत्ममग्न असा काही की विसरून गेलो उमजून घेणे त्यांचे ही थोडे काही ©️ShashikantDudhgaonkar